संच सूची

ट्रॅव्हल गाईड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ट्रॅव्हल गाईड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २० मे, २०१५

रोड ट्रिप

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो? मित्र-मित्रंनी एकत्र केलेली रोड ट्रिप हीच कथा होती.या सुंदर, रोमांचक प्रवासात किती काही घडतं! अलीकडच्या काळात बॉलीवूडने ही नवी चटकच भारतातल्या पर्यटकांना लावली आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाइकवर टांग मारून एक रस्ता धरायचा आणि सरळ सुटायचं!! युरोपातल्या चिमुकल्या देशांच्या सीमा ओलांडत केलेल्या रोड ट्रिप्स अविस्मरणीयच असतात! - पण भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि
रोमांचक रस्त्यांची ही सैर!

रविवार, ८ मार्च, २०१५

साद...

सरळसोट पर्वत, घनदाट जंगल आणि अंगावर घेऊ पाहणारा दर्‍याखोर्‍यांतला रोंरावता वारा. नजर पोहोचेल तिथपर्यंत चमकत्या सोन्यासारखा बर्फ, समुद्रकिनार्‍यांवरची घनगंभीर गाज,
हिमालयातलं शीतवाळवंट आणि घडीचा पर्वत. असलं काही कधी पाहिलंय, अनुभवलंय?

सोमवार, २ मार्च, २०१५

यावर्षी आवर्जून भेट द्यावी अशी शहरं

नवीन वर्षात कुठे फिरायला जाणार? काही प्लान ठरलेत की नाही? तुमचे प्लान ठरले असोत वा नसोत, एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत असाल तर हे नक्की वाचा. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्ह समजल्या जाणार्या लोनली प्लानेटने खास तुमच्यासाठी 2015मध्ये आवर्जून भेट द्यावी अशी टॉप 10 शहरांची यादी जाहीर केली आहे.

परदेशात फिरायला जायचं म्हटलं की युरोपचंच नाव सर्वतोमुखी. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं सिंगापूर, शॉपिंग फेस्टिवलसाठी दुबई अशी काही नेमकी नावंच नजरेसमोर येतात. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायात कमालीचे बदल होऊ लागले आहेत. नेहमीची ही ठिकाणं सोडून अर्ज़ेंटिना, ऑस्ट्रियासारखी, अंटार्क्टिकासारखी ठिकाणं आता पर्यटनासाठी समोर येऊ लागली आहेत. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्ह समजल्या जाणार्या लोनली प्लानेट या संकेतस्थळानेही यंदा आवर्जून भेट देता येतील, अशा काही हटके ठिकाणांचा परिचय बेस्ट इन ट्रव्हल 2015 अंतर्गत करून दिला आहे.

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०१५

लाँग वीकेंडची संधी साधायची असेल तर...

वीकेंडला जोडून सुट्ट्या आल्या की सहसा कोणाचेच पाय घऱात थांबत नाहीत. त्यामुळे अशा सुट्ट्या म्हणजे ग्रुप, एकट्याने किंवा कुटुंबासोबत फिरणार्यांसाठीही पर्वणीच. अनेकदा अशा सुट्ट्यांचा अगोदरच अंदाज घेऊन जवळपासच्या ठिकाणांची सैर केली जाते. खरं तर हा ट्रेंड पूर्वीपासूनचा. पण आता तोही बदलतोय. देशातली पर्यटन स्थळं सोडून देशाजवळील ठिकाणांची सैर करण्याचा ट्रेंड आता वाढतोय. विशेष म्हणजे ट्रॅव्हलिंग कंपन्याही आता चार ते पाच दिवसांचा वीकेंड हेरून शॉर्ट हॉल पॅकेजेस देऊ लागल्या आहेत.

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

पर्यटक नव्हे पाहुणा

जगाच्या एका टोकाला राहणार्‍या कुणा भटक्याला जगाच्या दुसर्‍या टोकावरचा समानधर्मा शोधून देण्याची ऑनलाइन यातायात

ब्रायन चेस्की आणि जो गिबिया हे दोघे रूममेट्स. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहायचे. खिशात कडकी. अपार्टमेंटचं भाडंही परवडणं मुश्कील अशी परिस्थिती होती. त्याच झगझगीत असताना त्यांनी एक जाहिरात पाहिली. इंडस्ट्रीयल डिझायनर्स सोसायटी ऑफ अमेरिका (आयडीएसए) तर्फे एक मोठी कॉन्फरन्स होणार होती. त्यासाठी येणार्‍या प्रतिनिधींपैकी ज्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करणं शक्य झालं नाही, त्यांच्यासाठी राहणं आणि नाश्ता अशा सोयी पुरवण्याची तयारी असलेल्या कुटुंबांसाठी कमी दिवसांत पैसे मिळवण्याची संधी अशी ती जाहिरात होती. ती वाचून ब्रायन आणि जो ने आपल्या लिव्हिंग रूममध्ये तीन गाद्या टाकून एक तात्पुरती बेडरूम तयार केली आणि तीन प्रतिनिधींच्या राहण्या-जेवणाची सोय करून पैसे कमावले.- ही आयडिया भलतीच भारी होती.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

पॉस्टेल आणि ब्रॅगी

 आपल्याकडचं पर्यटन अजूनही भटकण्याच्या टप्प्यावरचं. बरचसं चाकोरीतलं.  निसर्गरम्य ठिकाणं पाहायची,  फोटो काढायचे, खायचं-प्यायचं, मजा करायची आणि घरी परतायचं.

- रोचक म्हणावं असं कुतूहल नाही. नवीन ओळखीपाळखींचा आग्रह नाही. हौस असते ती घराबाहेर पडून मजा करण्याची. याचं कारण आत्ता कुठे खिशात पैसे खुळखुळायला लागलेला भारतीय पर्यटक अजून भटक्यांच्या जगातल्या साहसांना सरावलेला नाही. अंथरूण पाहून पाय
पसरण्याची शिकवण नसलेल्या पश्‍चिमी देशांमध्ये पोटाला चिमटे देऊन भटकंतीसाठी जग धुंडाळण्याची रीत जुनी आहे. त्यामुळे पंचतारांकित पर्यटन परवडणार्‍या पैसेवाल्यांबरोबरच एकेक डॉलर/पौंडाचा हिशेब करत भटकणारी मंडळीही संख्येने भरपूर असतात आणि पर्यटनाच्या क्षेत्रात कमीत कमी पैशात जास्तीत जास्त थरार अनुभवण्याचे मार्ग शोधणार्‍या नवनव्या क्लृप्त्या लढवण्यात त्यांचा हात धरणं कठीण! या गर्दीत आता भारतीय पर्यटकही दिसू लागले आहेत. त्या-त्या ठिकाणची संस्कृती, भाषा, माणसं, चालीरिती, खाद्यपदार्थ अशा प्रत्येक गोष्टीचा अत्यंत जवळून अनुभव घेण्याची ऊर्मी त्यांच्यात असते.
- या उत्साहामुळे जागतिक पर्यटन व्यवसायात दिवसेंदिवस नवनवीन शक्यता तयार होऊ लागल्या आहेत. ट्रेंड रुजू लागले आहेत. त्यातलेच हे तीन : पॉस्टेल, पीअर टू पीअर आणि ‘ब्रॅगी’.

पोटाला चिमटा घेऊन देश-विदेशात फिरण्याची हौस असलेल्या भटक्यांनी शोधले स्वस्तातल्या मौजमजेचे मस्त पर्याय - युरोपातले नवे ट्रेण्ड्स