संच सूची

मुशाफिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मुशाफिरी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

एका लग्नाची गोष्ट

एक जोडपं... 30 देश... 67 ठिकाणं... 67 लग्नं

Costa Rica- kevinheslinphoto.com
लग्न आयुष्यात एकदाच होतं. मग ते संस्मरणीय का नसाव? साधारण सगळ्याच लग्नेच्छुक जोडप्यांना असं वाटतंच. इंग्लंडमधील यॉर्कशायर काऊंटीत राहणार्या लिसा गँट आणि एलेक्स पेलिंग या जोडप्याच्या डोक्यातही असंच काहीतरी आलं. त्यातनं समोर आली ती एक भन्नाट कल्पना... जोपर्यंत आपल्याला लग्नासाठी आपल्या आवडीनुसार ठिकाण सापडत नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाण आणि तिथली लग्नपद्धती ट्राय करायची.  गेली  साडे तीन वर्षे हे जोडपं आपल्या लग्नासाठी परफेक्ट डेस्टिनेशन शोधतंय. त्यासाठी त्यांनी पालथी घातलीत जवळपास 30 देशांमधील 67 ठिकाणं आणि या जोडप्यानं केलीत 67 लग्न. 

रविवार, २२ फेब्रुवारी, २०१५

सरकता स्वर्ग

जग भटकायचं, पण विमानात पाऊल ठेवायचं नाही, असा पण करून कुणी प्रवासाला बाहेर पडलं तर? - पळणार्‍या रेल्वेतून मागे सरणार्‍या दृश्यांचे देखणे नजारे सारं सार्थकी लावतील!!

मायकेल हॉडसन पेशानं वकील.  आपल्या अशिलाची बाजू मोठय़ा तडफेनं  न्यायाधीशांसमोर  मांडायचा तेव्हा भले भले तोंडात बोट घालायचे, पैसाही उत्तम मिळायचा. पण रोज उठून काय तेच ते?.  आपलं करिअर अचानक त्याला बोअरिंग वाटायला लागलं. भटकण्याची आवड त्याला पहिल्यापासून होतीच. त्यानं आणखी एक ट्रायल घेतली. मध्य अमेरिकेतील निकाराग्वा देशाला पहिल्यांदा भेट दिली. २00७ साल सरताना महिनाभर केलेल्या या ट्रीपनं त्याला एकट्यानं प्रवास करण्याचा विश्‍वास दिला. त्याचा उत्साह दुणावला पृथ्वीसारख्या ज्या सुंदर ग्रहावर आपण राहतो, त्याचं डोळे भरून किमान दर्शन तरी आपण कधी घेणार, या विचारानं त्यानं थेट पृथ्वीप्रदक्षिणाच करायचा निर्णय घेतला! २00८ मध्ये त्यानं जगभ्रमंतीला सुरुवात केली, पण एक गोष्ट त्यानं मनोमन पक्की केली होती, काहीही झालं तरी विमानानं प्रवास करायचा नाही. 


रविवार, ८ फेब्रुवारी, २०१५

द शूटिंग स्टार

हिमालयाच्या कुशीतलं डेहराडून हे छोटंसं शहर. शैव्या नाथचं बालपण इथेच गेलं. उच्च शिक्षणासाठी ती सिंगापूरला गेली. तिथेच सिंगापूर टूरिझम बोर्डमध्ये जॉब मिळाला. डिजिटल मार्केटिंग अँड सोशल मिडिया प्रोफेशनल म्हणून काम करणारी शैव्या ट्रॅवल ब्लॉग्जवर तासनतास काढू लागली. प्रसिद्ध ट्रॅवल ब्लॉगर्सना ती फॉलो करू लागली आणि तिलाही भटकंतीचे वेध लागले. ती पैसे साठवू लागली. भटकण्यासाठी.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

पायी तुडवलेलं सहारा वाळवंट आणि १२000 किलोमीटर अंतर

लंडनमधील एका शिक्षिकेने दहा वर्षांपूर्वी घर सोडलं आणि थेट चालत निघाली. अर्धा युरोप पायी पालथा घातल्यानंतरच ती थांबली, पण तेही पुढच्या कदमतालसाठीच.


तिचं नाव पॉला कॉस्टंट. काहीतरी वेगळं करायचं या ध्यासानं पॉला झपाटलेली होती. तिला जग फिरायचं होतं. स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचं होतं. त्यासाठी तिनं मार्ग निवडला तोही एकदम हटके. जवळजवळ तीन वर्षे त्यावर विचार केला आणि एके दिवशी आपल्या शिक्षिकेच्या प्रतिष्ठित, उत्तम पगाराच्या नोकरीला राम ठोकला. निघाली प्रवासाला. तीही कशी? थेट पायी!

हनिमून ट्रॅव्हल्स (अनलिमिटेड)

675 दिवस, सहा खंड, 52 देश आणि 302+ ठिकाणं



लग्न झालं की हनिमून आलाच. मग हनिमूनसाठी कुठे जायचं, किती दिवस जायचं, याचे प्लान आणि तयारीही कित्येक महिने आधीच केली जाते. कारण एकच असतं, आपला हनिमून अविस्मरणीय, एक्सायटिंग ठरावा. बरं हा हनिमून असतो तरी किती दिवसांचा? मोजून चार ते आठ दिवसांचा. पंधरा दिवसांच्यावर नाहीच नाही. पण जगाच्या एका कोपर्यात अशी एक जोडी आहे जी, तब्बल 675 दिवसांचा हनिमून साजरा करताहेत.