‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आठवतो? मित्र-मित्रंनी एकत्र केलेली रोड ट्रिप हीच कथा होती.या सुंदर, रोमांचक प्रवासात किती काही घडतं! अलीकडच्या काळात बॉलीवूडने ही नवी चटकच भारतातल्या पर्यटकांना लावली आहे. गाडीत सामान भरून नाहीतर बाइकवर टांग मारून एक रस्ता धरायचा आणि सरळ सुटायचं!! युरोपातल्या चिमुकल्या देशांच्या सीमा ओलांडत केलेल्या रोड ट्रिप्स अविस्मरणीयच असतात! - पण भारतातही असे काही कमी रस्ते नाहीत! त्यातल्याच काही सुंदर, देखण्या आणि
रोमांचक रस्त्यांची ही सैर!
- दिल्ली ते लेह
अप्रतिम सृष्टिसौंदर्य लाभलेल्या या प्रदेशाच्या सफरीवर जून ते सप्टेंबर दरम्यान जाता येऊ शकते. बाईक किंवा कार यापैकी काहीही चालेल. रोहतांग पास, जांस्कर रेंज, नुब्रा घाटी, हिमालयातील विलोभनीय शिखरे.. वाटेत कायकाय भेटेल!!
अंतर : 990 किमी म्हणजे साधारण 3 दिवस लागतीलच.
मनाली : लेह हायवे (एन.एच. 21) वरून एकदा तरी प्रवास करावाच. स्वर्ग म्हणतात तो असाच असावा, असं या मार्गावरून प्रवास करताना वाटतं.
लेह ते श्रीनगरचा (एनएच 1 डी) प्रवास असाच सुंदर आहे.
- जयपूर ते जैसलमेर
जयपूर ते जैसलमेर मार्गावर असलेली छोटी छोटी शहरं, गावं तुमचं आदरातिथ्य करायला सज्जच असतात. तिथलं राहणीमान, त्यांचे पेहराव, संस्कृती, स्वादिष्ट जेवण सगळंच रंगांमध्ये भिजलेलं.
अंतर : 570 किमी, 9 तास.
टीप : कुंभलगढचा कुंभलगढ किल्ला आणि वाईल्डलाइफ सँक्च्युरीसठी वाटेत थांबायला विसरू नका.
- मुंबई ते गोवा
पहाटे 5 च्या दरम्यान एनएच 17 मार्गे निघालात तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही गोव्यात पोचू शकाल.
अंतर : 615 किमी, 10 तास
टीप : हा मार्ग आणि तिथला निसर्ग नितांत सुंदर आहे. फक्त तुमचा कॅमेरा रेडी ठेवा.
- बंगळुरूते कुर्ग
भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळख असलेलं कुर्ग तुम्हाला तिथल्या निसर्गासोबत खाद्य पदार्थांसाठीही नक्कीच आवडेल. पश्चिम घाटातला हा प्रवास संस्मरणीय आहे.
अंतर : 260 किमी, 5 तास
टीप : म्हैसूर शहरात प्रवेश न करता श्रीरंगपटणच्या बायपासरोडने कुर्ग मार्गे जा. शहरातली वाहतूक कोंडी टाळता येईल.
- जयपूर ते रणथंबोर
जयपूर ते रणथंबोरचा प्रवासही तुम्हाला नक्की आवडेल. रणथंबोर व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असलं तरी इथला पानगळीचा जंगलाचा थरारक अनुभवही रोमांचित करणारा आहे. छोटय़ा-छोटय़ा गावांमधून जाणारा रस्ता तसंच रस्त्याशेजारील धाबे तुमच्या ग्रुपमधील खवय्यांसाठी पर्वणी ठरू शकतात.
अंतर : 180 किमी 4 तास
टीप : रणथंबोरला जाण्यासाठी जमल्यास टोंक मार्ग निवडा. या मार्गावरील रस्ते सुस्थितीत आहेत. शिवाय या रस्त्यांशेजारच्या धाब्यांवर मिळणा:या दालबाटीची चव घ्या.
- कोलकाता ते कुमाउॅँ
Road to Binsar |
कोलकातापासून कुमाउँला जाणारा मार्ग इतका सोयीस्कर आहे की अगदी नवखा ड्रायव्हरदेखील ही सहल मस्त एंजॉय करू शकेल. वाराणसीच्या घाटातून जाणारा मार्ग शिवाय थोडय़ा-थोडय़ा अंतरावर असलेले पेट्रोल पंप आणि रेस्तराँमुळे तुमच्या प्रवासाची अर्धी अधिक काळजी मिटते.
अंतर : 130 किमी, 4 दिवस
टीप : वाटेत बिनसर अभयारण्यालाही भेट द्यायची असेल तर मेन रोडला लागून असलेल्या जर्मन बेकरीतही जाऊन या. इथल्या पिङझा आणि थुक्पाची चव जरूर घ्या.
- अहमदाबाद ते दीव
Dholavira |
स्वच्छ समुद्रकिनारे ही इथली खासियत. पर्यटकांकडून थोडा दुर्लक्षित राहिलेला हा स्पॉट उन्हाळ्याच्या सुटीत भटकंतीसाठी मस्त!
अंतर : 380 किमी, 8 तास
टीप : धोलवीराला आठवणीने भेट द्या.
- मुंबई ते माउंट अबू
Lake Nakki |
उन्हाळ्याच्या सुटीत अनेकजण आपलं गाव गाठतात किंवा जवळपासच्या पर्यटन स्थळांना भेट देतात. यंदाच्या उन्हाळ्यात तुमच्यासाठी माउंट अबू चांगला ऑप्शन ठरू शकतो. इथला नक्की लेक रिलॅक्स होण्यासाठीचा उत्तम पर्याय. शिवाय अहमदाबादमध्ये थांबून हे शहर जाणूनही घेता येईल.
अंतर : 745 किमी, 12 तास
टीप : एनएच 18 मार्ग सोयीस्कर. या मार्गावर भरपूर पेट्रोल पंप व धाबे आहेत.
- गुवाहाटी ते तवांग
Tawang Monastery |
गुवाहाटी ते तवांग मार्गावर चेरापुंजी, इंफाल, काझीरंगासारखे निसर्ग सौंदर्याने नटलेले सुंदर पिकनिक स्पॉट आहेत.
अंतर : 480 किमी, 9 तास
टीप : तवांगला जाताना बोम्दिलामार्गे जा. येताना तुम्ही भालुकपोंग येथे थांबू शकता. हादेखील एक चांगला पिकनिक स्पॉट आहे. तवांग मार्गावर अनेक चहा, मोमोजचे स्टॉल्स आढळतात.
- अहमदाबाद ते कच्छ
Rann of Kutch |
कच्छला जाण्यासाठी डिसेंबर ते मार्चदरम्यानचा काळ सर्वात उत्तम. चंद्राच्या शीतल प्रकाशात चमकणा:या कच्छच्या वाळवंटाचं सौंदर्य पाहण्याबरोबरच तिथली संस्कृती, हस्तशिल्प, पारंपरिक संगीत, जीवनशैली सारं काही अनुभवता येईल. शिवाय इथलं जंगली गाढवांचं अभयारण्यही पाहता येईल.
अंतर : 400 किमी, 7 तास
टीप : इथल्या हस्तशिल्पांसाठी होदका गावाला आवर्जून भेट द्या.
- चेन्नई ते येलिगरी
yelagiri hills |
येलिगरी हे डोंगर : टेकडय़ांनी वेढलेलं छोटंसं शहर. इथले रस्ते, डोंगर, घनदाट वनराई म्हणजे बाइकर्स, ट्रेकर्सकरता पर्वणीच.
अंतर :228 किमी, 4 तास
टीप : पावसाळ्यात हा मार्ग सर्वात सुंदर असतो पण त्यादरम्यान येथे दरडी कोसळतात. त्यामुळे सावधानतेने प्रवास करा.
- मुंबई ते तारकर्ली
Tarkarli |
महाराष्ट्रातला स्वच्छ नितळ किनारा! हा परिसर फारसा गजबजलेला नाही. तारकर्लीच्या निळ्याशार समुद्रात स्कुबा ड्राइवचा अनुभव नक्की घ्या.
अंतर :535 किमी, अंतर 9 तास
टीप : मुंबईपासून एनएच 17 ने कासल गाठायच. तेथून एसएच 1क्8 मार्गे तारकर्ली. या मार्गावरील नैसर्गिक सौंदर्य पाहूनच लाँग ड्राइवमुळे येणारा थकवा दूर पळेल.
- बंगळुरू ते मुन्नार
Munnar |
मुन्नार हा पर्यटकांसाठीचा उन्हाळ्यातला विसावा. इथल्या चहाच्या बागा. चहा संग्रहालय, टी प्रोसेसिंग, अर्नाकुलम राष्ट्रीय उद्यान हे मुख्य आकर्षण.
अंतर : 476 किमी, 10 तास
टीप : इथे सेल फोन कवरेज मिळत नाही. त्यामुळे डिसकनेक्टेड राहण्याची तयारी ठेवा.
- दिल्ली ते जयपूर
City Palace |
भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोण म्हणजे दिल्ली-आग्रा-जयपूर. आग्य्राला ताजमहलसाठी, रणथंबोरला व्याघ्रप्रकल्पासाठी आणि जयपूरला तिथल्या राजवाडय़ांसाठी भेट देता येईल. सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महल, मुबारक महल, जलमहल हे त्यापैकीच एक.
अंतर : 275 किमी, 5 तास
टीप : एनएच 11 मार्गे जयपूर गाठण्यापूर्वी राजस्थानी धाब्यांवर थांबणं विसरू नका.
- एनएच 212
NH 212 |
- हैदराबाद ते कन्नूर
kannur |
कन्नूरमधली आकर्षणं म्हणजे पयमबल्लम बीच, मुजुपिलंगड बीच, थलस्सरी किला, अरालम वाइल्डलाइफ सँक्च्युरी, स्नेक पार्क, मदायी मिस्जद, सेंट एंजलो फोर्ट इत्यादी. शहरी वातावरण कंटाळलेले हजारो पर्यटक येथे निसर्गाच्या सान्निध्यात विसावा घेण्यासाठी येतात.
अंतर : 897 किमी, 14 तास
टीप : कन्नुरला कुर्गमार्गे जाणो सोयीस्कर. पोचायला थोडा उशीर होतो पण ओबडधोबड रस्त्यांमुळे होणारा त्रस चुकवता येतो.
- चेन्नई ते पॉँडिचेरी
Salt bank |
फ्रेंच संस्कृती अनुभवायची असेल तर पाँडिचेरीला जायलाच हवं. शिवाय चेन्नईपासून 5क्-6क् किमी अंतरावर असलेली मिठागरं पाहता येतील. या मार्गावरील नागमोडी वळणं बाइक रायडर्ससाठी नक्कीच आव्हानात्मक ठरतील. पण जरा जपून!
अंतर : 60 किमी. 3 तास तरी लागतीलच.
- दिल्ली ते डेहराडून
NH 58 |
दिल्लीतून एनएच 58 पकडायचा आणि छोटी छोटी शहरं,
गावं पार करत डेहराडून गाठायचं. ट्रेकिंग, हायकिंग, स्कीइंग करणा:यांना डेहराडून नक्कीच आवडेल.
अंतर : 255 किमी, 5 तास
टीप : या मार्गावर नेहमी ट्रॅफिक जाम असतंच. डेहराडूनला पोहचण्यासाठी दुसरा मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही.
- दार्जिलिंग ते पेलिंग
Darjiling to pelling |
अंतर : 110 किमी, 3 तास
टीप : या प्रवासाला निघण्यापूर्वी वेदर अपडेटवर नजर टाकायला विसरू नका.
- कोलकाता ते पुरी
Puri beach |
सिटी ऑफ जॉय, लॅण्ड ऑफ बीचेस अशी बिरूदावली मिरवणा:या कोलकातातून पुरी पर्यंतचा प्रवास म्हणजे मस्तच. टूरिस्ट मॅपवर अजूनही एंट्री न मिळालेली कुलियाना, बिसंगासारखी ठिकाणं या मार्गावर शोधू आणि पाहू/अनुभवू शकता.
अंतर : 500 किमी, 11 तास
- पामबन पूल
Rameshwaram Pamban Bridge |
http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=1774
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा