सोमवार, २ मार्च, २०१५

यावर्षी आवर्जून भेट द्यावी अशी शहरं

नवीन वर्षात कुठे फिरायला जाणार? काही प्लान ठरलेत की नाही? तुमचे प्लान ठरले असोत वा नसोत, एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत असाल तर हे नक्की वाचा. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्ह समजल्या जाणार्या लोनली प्लानेटने खास तुमच्यासाठी 2015मध्ये आवर्जून भेट द्यावी अशी टॉप 10 शहरांची यादी जाहीर केली आहे.

परदेशात फिरायला जायचं म्हटलं की युरोपचंच नाव सर्वतोमुखी. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेलं सिंगापूर, शॉपिंग फेस्टिवलसाठी दुबई अशी काही नेमकी नावंच नजरेसमोर येतात. मात्र गेल्या काही वर्षांत पर्यटन व्यवसायात कमालीचे बदल होऊ लागले आहेत. नेहमीची ही ठिकाणं सोडून अर्ज़ेंटिना, ऑस्ट्रियासारखी, अंटार्क्टिकासारखी ठिकाणं आता पर्यटनासाठी समोर येऊ लागली आहेत. पर्यटन क्षेत्रात विश्वासार्ह समजल्या जाणार्या लोनली प्लानेट या संकेतस्थळानेही यंदा आवर्जून भेट देता येतील, अशा काही हटके ठिकाणांचा परिचय बेस्ट इन ट्रव्हल 2015 अंतर्गत करून दिला आहे.


वॉशिंग्टन डीसी

वॉशिंग्टन नावाची अमेरिकेत चार शहरे आहेत. पण वॉशिंग्टन डीसी अर्थात वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट कोलंबिया या शहराबद्दल वेगळं काही सांगायला नको. अमेरिकेच्या राजकारणाचं सत्ताकेंद्र असलेले हे शहर ऐतिहासिक दृष्टय़ाही प्रचंड ठेवा जपून आहे. वस्तुसंग्रहालये आणि स्मारकांचं शहर म्हणून ओळखल्या जाणार्या या शहरात अमेरिकेच्या राज्यक्रांतीच्या आणि त्यानंतरच्या अनेक चळवळींच्या पाऊलखुणा आढळतात. विशेष म्हणजे, अमेरिकेचे सर्वात लोकप्रिय अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या हत्येला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यावर्षी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे अनेक कार्यक्रम शहरात होणार आहेत. शिवाय लिंकन यांची हॉट, त्यांचे प्राण घेणारे पिस्तुल तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक वस्तू येथे प्रदर्शनासाठी खुल्या केल्या जातील. एवढंच नाही तर, वॉशिंग्टन डीसी शहराच्या आडबाजूला उभं रहात असलेलं सिटीसेंटर डीसी आणि ऑनाकोस्टीया नदीच्या काठावर वसत असलेले द यार्ड्स या नव्या नगरी पाहण्यासारख्या आहेत.

काय पहाल ?


- नॉशनल मॉल, नॉशनल म्युझियम ऑन नॉचरल हिस्ट्री या वस्तुसंग्रहालयासोबतच अन्य वस्तूसंग्रहालये.
- लिंकन मेमोरीयल
- अमेरिकेचे राष्टाध्यक्ष राहत असलेले व्हाईट हाऊस, संसद, न्यायालय.
- 176 देशांचे दूतावास
- जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व इतर जागतिक संस्थांची मुख्यालय

 एल चलतें

अर्ज़ेंटिनातील एल चलतें म्हणजे निसर्ग प्रेमींसाठी मोठी पर्वणीच. हे शहर डोंगरांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. उंचच उंच बर्फाच्छादित टोकदार शिखरं असलेलं एल चलतेंला अर्ज़ेंटिनाची ट्रेकिंग राजधानी म्हणून ओळखल जातं. चिलीसोबत असलेला सीमावाद मिटवण्यासाठी 1985 मध्ये हे शहर नव्यानं वसवण्यात आलं होतं. या गोष्टीला यंदा 30 वर्षे पूर्ण होत आहेत.


 काय पहाल?

- माऊंट फित्झ रोय, सेरो तोरे हे पर्वत ट्रेकर्सना नेहमीच खुणावतात. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये माऊंट फित्झ रोयच्या पायथ्याशी नॉशनल ट्रेकिंग फेस्टिवलचेही आयोजन केले जाते.
- व्हिएदमा- जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेली व्हिएदमा (viedma) ही अर्जेटिंनातील सर्वात मोठी हिमनदी आहे. प्रशस्त (2 किमी रूंदीचे पात्र)
- डेझर्ट लेक - फिशिंग, सायकलिंग, हॉर्स रायडिंग, काएकिंगसाठी डेझर्ट लेकला नक्की भेट द्या.

मिलान


इटलीचं औद्योगिक, व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र असलेल्या मिलानमध्ये प्राचीन आणि आधुनिकतेची सरमसळ पाहायला मिळते. फॉशनक्षेत्रातील अनेक व्यवसायांचं केंद्र असलेलं हे शहर म्हणजे डोळे दीपवून टाकणारी संपत्ती आणि मनाची धडधड वाढवेल, असं र्स़ौंदर्य यांचा संगम आहे. तुमच्या घरातल्या कॉम्प्युटरपेक्षाही महाग किमतीचे बूट घालून फिरणारे बँकर्स, प्रॉडाच्या हॉण्डबॉगा घेऊन अतिश्रीमंतीचे दर्शन घडवणाऱया कमनीय ललना आणि आलिशान कार्यालये पाहिली की तुमच्याआमच्यासारख्या सामान्याला थोडासा बुजरेपणा येऊ शकतो. पण एरव्ही स्वत:च्या दुनियेत मश्गुल असलेलं हे शहर यंदा एक्स्पो 2015’च्या निमित्ताने दोन्ही बाहू खुले करून पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतंय. 1800 वर्षांपासून भरवण्यात येत असलेली ही महाजत्रा यंदा मे ते ऑक्टोबरदरम्यान होत आहे. इटालियन खाद्यपदार्थ, 11 लाख चौरस मीटरवर पसरलेली जत्रा, त्याला प्राचीन रोमन शहरासारखा दिलेला लूक, कृत्रिम तलाव यांनी हे शहर यंदा रंगून जाईल.

काय पहाल ?

- ड्युमो दि मिलानो - पांढर्या संगमरवरातील गॉथिक शैलीतलं कॉथीड्रल.
- ब्रेरा पॉलेस - उत्कृष्ट चित्रकलाकृतींच्या संग्रहासाठी प्रसिद्ध
- लिओनार्दो दा विंची विज्ञान व तंत्रविद्या संग्रहालय
- आंब्रोसियन ग्रंथालय - दुर्मिळ ग्रंथ व प्राचीन हस्तलिखितांकरता प्रसिद्ध
     - टिएट्रो अला स्काला (थिएटर), सँटा मारिआ डेल ग्राझी चर्च (दा विंचीच्या द लास्ट सपर या उत्कृष्ट भित्तिचित्रासाठी प्रसिद्ध)
  

झरमॉट

स्वित्झर्लंडमधील चारही बाजूंनी पर्वतरांगांनी वेढलेले झरमॉट शहर पर्वतारोहण व स्कीईंगसाठी प्रसिद्ध आहे. या भागात रोपवेचं भलं मोठं जाळं पहायला मिळतं. या पर्वतरांगांत आपल्या साहसाची हौस पूर्ण करण्यासाठी हजारो गिर्यारोहक आणि स्कीअर्स येथे दरवर्षी येत असतात. पण यंदा हा परिसर मॉटरहॉर्न या मुख्य पर्वतावरील चढाईची दीडशे वर्षे साजरी करत आहे. ब्रिटिश गिर्यारोहक एडवर्ड व्हीम्पर आणि त्यांच्या सात साथीदारांनी 14 जुलै 1865 रोजी सुरू केलेल्या मॉटरहॉर्नवरील चढाईनंतर या चमूतील चौघे दोर तुटल्याने बाराशे मीटरच्या उंचीवरून कोसळून गतप्राण झाले. पण व्हीम्पर यांनी 4478 मीटर उंचीचा मॉटरहॉर्न सर केलाच. त्यांच्या या चढाईच्या दीडशेव्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
  
काय पहाल?

- मॉटरहॉर्न - हे 4478 मीटर उंचीचं आल्प्समधील 6 व्या क्रमांकाचं गिरीशिखर आहे.  
- मॉटरहॉर्न ग्लेसिअर पॉराडाईस - युरोपमधील सर्वात उंच केबल कार स्टेशन. जवळपास 3883 मीटर उंचीवर असलेल्या या स्टेशनवर रेस्तराँही आहे.
- कॉगव्हील रेल्वे - झरमॉटमधून ही रेल्वे केवळ 33 मिनिटांत गॉर्नरग्राटला (3089 मीटर उंच) पोहचते. या अर्ध्या तासाच्या अवधीत पर्वतरागांमधील अद्भूत नजराणा -   तुमच्यासमोर उभा राहतो.

व्हॉलेत्ता

माल्टाची राजधानी असलेलं व्हॉलेत्ता हे  जेमतेम सात-आठ हजारांची लोकवस्ती असलेलं छोटंस शहर. पण ऐतिहासिक दृष्टय़ा अगदी सोळाव्या शतकापासूनच्या आठवणी या शहरात पाहायला मिळतात. आजही बऱयापैकी दिमाखात उभ्या असलेल्या या इमारती आणि त्यापलिकडे दिसणारा कोबाल्ट समुद्र हे दृश्य न्यारंचं. पण अगदी अलिकडेच या शहराने आधुनिकतेचा साजही चढवायला सुरुवात केली आहे. शहरांचं नवीन प्रवेशद्वार, दगडांना कौशल्याने कापून रचून बनवण्यात आलेली संसदेची इमारत, ऑपेरा हाउसवरील धातूचा सांगाडा या नवीन गोष्टींनी शहराचा दिमाख अधिकच वाढवला आहे. यंदा या शहराला भेट देण्याचं कारण म्हणजे, माल्तीश सैन्याने तुलनेने आणि संख्येने प्रबळ अशा तुर्की सैन्याला परतवून शहरावर पुन्हा ताबा मिळवल्याच्या घटनेला यंदा साडेचारशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने 8 सप्टेंबरला या शहरात विशेष कार्यक्रम होणार आहेत.


 काय पहाल?

- 16व्या शतकातील इमारती.
- सेंट जॉन्स को-कॉथिड्रल
- काव्हाजिओचे सर्वात मोठे चित्र.

प्लॉव्हडीव्ह


बल्गेरियातलं दुसऱया क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या प्लॉव्हडिव्हचा इतिहास इसवी सनपूर्व 6 हजार वर्षांपासूनचा आहे. अगदी रोमदेखील प्लॉव्हडिव्हपुढे तरुण आहे. आजवरच्या इतिहासात अनेक नावं बदलणाऱया या शहराने निओलिथिक वस्तीपासून थॉरिकन गढी असं रूपांतर अनुभवलं आहे. रोमन, बायझेंटाइन आणि ओट्टोमन अशा अधिपत्यांखाली राहून गेलेल्या या शहरात दोनशेहून अधिक पुरातत्व स्थळे पाहायला मिळतील. अनेक प्राचीन इमारती आजही व्यवस्थितपणे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. शहराच्या एका बाजूला पार्श्वभागी झळकणाऱया ऱहोडोप पर्वतरांगा शहरांचं सौंदर्य अधिकच खुलवतात.


काय पहाल?

- प्राचीन जुमाया मशीद
- सेंट नादेल्याज बेल टॉवर
- अनेक पुरातत्व इमारती.
- ऱहोडोप पर्वतरांगांतील आसेन गढी, बाच्कोव्ह मठ

सॉल्झबरी

इंग्लंडमधील विल्टशायर प्रांतातील या शहराला स्टोनहेंजमुळे तशी ओळख आहेच. या शहरापासून जवळपास 13 किमीवर एका मैदानात दिसणारं दगड रचलेलं शिल्प जागतिक आश्चर्य मानलं जातं. तीन हजार वर्षांपूर्वी करण्यात आलेली ही रचना का आणि कोणी केली, ते आजही गूढ आहे. पण केवळ स्टोनहेंज पाहण्यासाठी सॉल्झबरीला येणाऱया पर्यटकांना यंदा या शहरातला मुक्काम थोडा वाढवावा लागेल. सन 1215मध्ये राजाचे अधिकार कमी करून जनतेच्या मुलभूत हक्कांत वाढ करणाऱया मॉग्ना कार्टा या सनदेला 15 जून रोजी 800 वर्षे पूर्ण होत आहेत. कायदा आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱया जगभरातील चळवळींना प्रेरणा देणाऱया या कराराची मूळ प्रत सॉल्झबरीमध्ये आजही जतन करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी जून महिन्यात या शहराला उत्सवी रूप मिळाल्याचे पाहायला मिळेल.

काय पाहाल?

- मॉग्ना कार्टा जतन करून ठेवण्यात आलेले चॉप्टर हाउस.
- मध्ययुगीन काळातील सॉल्झबरी कॉथेडरल.
- पोल्ट्री क्रॉस
- सन 1327मधली दगडी कमान
- नाइटक्लब, पब्समधील झगमगाट.

व्हीएन्ना

ऑस्ट्रीयाच्या सांस्कतिक, आर्थिक आणि राजकीय घडामोडींचे हे शहर युरोपीय महासंघातील दहावे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. अगदी इ.. पूर्व  5व्या शतकापासून व्हिएन्नाचा उल्लेख इतिहासात आढळतो. संयुक्त राष्ट्रे आणि ओपेक अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालये असलेले हे शहर अनेक प्राचीन वास्तूंसाठीही प्रसिद्ध आहे. येथील 13व्या शतकातील रिंग्जट्रसे, 18व्या शतकातील रॉटहाउस टाउनहॉल, पहिलं ऑपेरा हाउस अशा अनेक वास्तू येथे पाहायला मिळतील. मात्र, यंदा रिंग्जटॉसेच्या दीडशेव्या वर्षानिमित्त व्हिएन्नाला वेगळाच साज चढणार आहे.

काय पाहाल?

- संयुक्त राष्ट्रे, ओपकच्या इमारती
- 650 वर्षे जुने व्हिएन्ना विद्यापीठ.
- ऑपेरा हाउस,
- सिगमंड फ्रॉइड वस्तुसंग्रहालय

चेन्नई

हुश्श! जगभरातील अनाहूत आणि उच्चारतानाही जीभ अडखळवणारी नावं असलेल्या शहरांच्या पंक्तीत अखेर भारतातल्या शहराला स्थान मिळालं!! देशातल्या प्रमुख महानगरांपैकी एक असलेलं चेन्नई हे दिल्ली, मुंबई आणि कोलकाताच्या तुलनेत तसं दुर्लक्षित राहिलेलं शहर आहे. पण त्याहूनही दुर्लक्षित या शहरातील ऐतिहासिक पाऊलखुणा आहेत. आजही परदेशी नव्हेच तर देशी पर्यटकांनाही चेन्नईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे सांगताना  ततपप होईल. पण द्रवीड संस्कृतीतील मंदिरांपासून शास्त्राeय नृत्याच्या संस्थांपर्यंत आणि ब्रिटिशकालिन किल्ल्यांपासून चौपाटय़ांपर्यंत चेन्नई अनेक विविधतेने नटलेले आहे.

काय पाहाल?

- मरिना बीच
- द्राविडीयण मंदिरे
- ब्रिटिशकालिन चर्च
- सेंट जॉर्ज किल्ला

टोरोंटो

तब्बल 140 भाषा बोलणाऱयांचं कॉनडातलं टोरोंटो हे जगातील सर्वाधित बहुसांस्कृतिक शहर आहे. इथल्या कोन्डो टॉवर, महामार्ग, आधुनिक इमारती अशा अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. पण यावर्षी येथे होणाऱया पॉन अमेरिकन स्पर्धा हे तेथील पर्यटनाचं मुख्य कारण असणार आहे. टोरोंटो संस्कृतीतलं वैविध्य आणि अमर्याद खाद्यपदार्थांची लज्जत चाखण्यासाठी येथे लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात.

काय पाहाल?

- सीएन टॉवरवरून 360 अंशात दिसणाऱया शहराचं दृश्य.
- टोरोंटो बेटाला जाणारी बोटसेवा.
- ट्रम्प हॉटेल

http://www.lonelyplanet.com/


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा